Thursday, 17 January 2019

राँग नंबरचं राईट लग्न!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळत असतात असं म्हंटल जात परंतु केवळ एका फोनच्या कॉलच्या माध्यमातून लग्न झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे यात केवळ एका फोनच्या रॉंग नंबरमुळे या लग्नाच्या गाठी जुळल्या.

 

2012 मध्ये झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर आपलं कधी लग्न होईल असा विश्वासही ललितानं गमावला होता. पण मालाडच्या राहुल कुमार नावाच्या तरुणानं चुकून केलेल्या एका फोन कॉलमुळे ललिताचं आयुष्य सुखद वळणावर येऊन पोहोचलं.

 

राहुल कुमारनं राँग नंबर डायल केला, पण तो लागला ‘राईट नंबर’ला.... तो म्हणाला की त्याचं ललिताच्या मनावर प्रेम आहे, चेहऱ्यावर नाही. विशेष म्हणजे ललिता आणि राहुलच्य़ा लग्नासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

 

अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक उद्योजकांनी ललिताला मदत केली. देव माणसात असतो असं म्हणतात. आज राहुल आणि ललिताला मदत करणाऱ्यांच्या रुपात त्याचं दर्शन घडलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य