Sunday, 20 January 2019

गुरूपौर्णिमेला या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

यंदा गुरुपौर्णिमेला म्हणजे 27 जुलै 2018 ला या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. 27 जुलैच्या रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून 28 जुलैच्या सकाळी 3 वाजून 5 मिनिटांनी चंद्रग्रहण संपणार आहे. चंद्रग्रहणाचा सूतककाळ हा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.

जगभरात विविध ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसणार आहे.

वर्ष 2018 मध्ये दोन चंद्र ग्रहण घटित होतील. यात पहिला चंद्र 31 जानेवारी 2018ला दिसला आणि दुसरा चंद्र ग्रहण 27 -28 जुलै 2018ला दिसेल. हे दोन्ही पूर्ण चंद्र ग्रहण असतील आणि भारतसमेत इतर देशांमध्ये देखील दिसतील.
  

27-28 जुलै 2018 दुसरं चंद्र ग्रहण

 • वेळ  : 23:56:26 ते 03:48:59 वाजेपर्यंत
 • दृश्यता : भारत, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तरी अमेरिका चे दक्षिणी हिस्से, साऊथ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्कटिका 
 • उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने लालसर , काळसर दिसेल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल.

 • त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल.

 • उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल.सर्व ठिकाणांहून याच वेळी चंद्रग्रहण दिसणार आहे.                                       

 • या चंद्रग्रहणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रहणाच्यावेळी चंद्रबिंबाच्या दक्षिणेस सात अंशावर मंगळ ग्रह दिसणार आहे.

 • २७ जुलै रोजीच  मंगळाची प्रतियुती होणार असून मंगळ ग्रह ३१ जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष कि. मीटर अंतरावर येणार आहे.

 • सध्या आपल्याइथे पावसाळा असल्याने आकाश अभ्राच्छादित राहते. परंतु ज्या ठिकाणी आकाश निरभ्र असेल तेथून खग्रास चंद्रग्रहण व मंगळ दर्शनाचा लाभ घेता येईल.

 • या नंतर पुढच्यावर्षी मंगळवार , १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?

 • जेव्हा चंद्र (पृथ्वीवरुन पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण होते.
 • खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही.
 • परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र असे घडत नाही.
 • पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवíतत होऊन चंद्रावर पडतात.
 • त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो.

खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?

 • जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरुन पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळ खंडग्रास चंद्रग्रहण होते.

ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?

 • सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो.
 • या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते.
 • ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते.
 • ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास चंद्रग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास चंद्रग्रहण होय.
 • अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते.
 • त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते.
 • चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो. णाचे अचूक अंदाज सर्वप्रथम कोणी वर्तविले?

राहू व केतू म्हणजे काय?

 • पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत.
 • त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय.
 • याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय.
 • ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते.
 • राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात

दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?

 • अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते.
 • पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
 • सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वीl पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावल
 

सूतकाची वेळ - 

 • सूतक प्रारंभ 27 जुलै 2018ला 12:27:26 वाजेपासून
 • सूतक समाप्त 28 जुलै 2018ला 03:48:59 पर्यंत
 

ग्रहणात गर्भवती महिलांनी या गोष्टींकडे लक्ष ठेवावे

 • ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना विशेष सावधगिरी बाळगायला पाहिजे.
 • या दरम्यान गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्याआधी ग्रहण बघू नये.
 • ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना सिलाई, कढई, कापणे आणि सोलणे सारखे कार्य करू नये.
 • अशी मान्यता आहे की ग्रहणच्या वेळेस चाकू आणि सुईचा प्रयोग केल्याने गर्भात वाढत असलेल्या शिशूच्या अंगाला नुकसान पोहचू शकत.

ग्रहणादरम्यान ही घ्या काळजी

 • ग्रहणादरम्यान कच्च्या भाज्यांचा, फळांचा आहारात समावेश करणं टाळा. यामध्ये ग्रहणादरम्यान  काही बदल होण्याची शक्यता कमी होते. 

 • ग्रहणात शिजवलेल्या, साठवलेल्या पदार्थांपासून दूर रहावे. ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. 

 • ग्रहणादरम्यान मांसाहार, अल्कोहल, हाय प्रोटीनयुक्त पदार्थ टाळावेत. मात्र ग्रहणाचा काळ संपल्यानंतर तुम्ही सामान्यपणे जेवू शकता. ग्रहणानंतर फळं खाणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. सोबत शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य