Sunday, 20 January 2019

फायदेयुक्त लेमन टी, नियमित सेवनाने चेहरा तजेलदार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी लेमन टी खूप फायदेशीर आहे. जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स वाढतात. लेमन टी चे नियमित सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात. त्यामुळे पोटाचे कोणतेही विकार होत नाही. लेमन टी प्यायल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहून शरीरात उर्जा निर्माण होते. आतड्यांचे विकार असणाऱ्यांसाठी लेमन टी उपयुक्त आहे.

लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत. दिवसांतून 3-4 वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि कोलेस्टरॉल कमी होते. सर्दी, ताप असल्यास लेमन टीमध्ये आलं टाकून, दिवसांतून 3-4 वेळा प्यायल्यास सर्दी बरी होते. घशाची खवखव आणि खोकला बरा करण्यासाठी लेमन टी उपयुक्त आहे.

लेमन टी मध्ये मध आणि साखर मिश्रित करून दररोज सेवन केल्याने चेहरा तजेलदार दिसतो. लेमन टीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरूमे आणि काळे डाग कमी होतात. सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी राहण्यास मदत होते. भूकेचंही प्रमाण नियंत्रित राहते. ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य