Wednesday, 19 December 2018

...तर या रंगाचा टेडीबिअर दिला तर तुमच लव्ह रिलेशनशिप होईल आणखी स्ट्रॉंग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

14 फेब्रुवारीच्या आठवड्याभरा आधीच व्हेलेंटाईन डे चा फीवर सगळीकडे पहायला मिळतो.

रोज डे, चॉकलेट डे नंतर येणारा टेडी डे देखील तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार टेडी गिफ्ट देऊन आपल्या पार्टनरला इम्प्रेंस करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या पार्टनरच्या राशीप्रमाणे त्या रंगाचा टेडी गिफ्ट केल्यास तुमची लव्ह रिलेशनशिप आणखी स्ट्रॉंग होउ शकते.

 मेष- या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव स्वाभिमानी असतो. त्यांना लाल, सफेद, गुलाबी, गोल्डन किंवा पिवळ्या रंगाचा टेडी द्या.

वृषभ-  या राशीचे लोक उच्च विचाराचे असते. या राशीच्या लोकांना गुलाबी, क्रीम, सफेद रंग आवडतात. यामुळे या रंगाचे टेडी देणे उत्तम.

मिथुन- या राशीच्या लोकांना हिरवा रंग आवडतो. या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात. यांना कोणत्याही रंगाचा टेडी द्यावा.

 कर्क- या राशीचे लोक भावुक असतात. यांना पिवळ्या रंगाचा टेडी द्यावा.

सिंह-  या राशीच्या लोकांचे विचारही सिंह अर्थात राजाप्रमाणे असतात. यांना सफेद, गोल्डन आणि पिवळ्या रंगाचा टेडी दिल्यास ते नक्कीच खूश होतील.

कन्या-  या राशीच्या व्यक्तींना व्यस्त जीवन शैली आवडते. पीच, लाइट ब्लू आणि लाइट पिंक रंगाचा टेडी द्या.

तुला- यांना संतुलीत लाईफस्टाईल आवडते. यांना नीळा रंग अधिक आवडते. यांना सफेद आणि पिवळ्या रंगाचा टेडी द्या.

वृश्चिक-  हे लोक अत्यंत हुशार असतात. यांना पर्पल, ब्राउन, ग्रीन आणि लाल रंगाचा टेडी द्या.

धनु- यांना अध्यात्माची आवड असते. यांना लाल, नीळा, नारंगी रंग आवडतात. मात्र, सफेद रंगाचा टेडी दिल्यास ते जास्त आनंदी होतील.

मकर-  हे लोक कठोर स्वभावाचे असतात. यांना लाल रंगा ऐवजी सफेद रंगाचा टेडी द्या.

कुंभ- यांना समजून घेणे अवघड असते. त्यामुळे यांना शक्यतो लाल रंगाचा टेडी द्या.

मीन- हे व्यक्ती  इमोशनल असतात. यांना पिवळा रंग आवडतो. मात्र, यांना इंप्रेस करायचे असल्यास  सफेद अथवा लाल रंगाचा टेडी द्या.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य