Friday, 18 January 2019

सारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणारा अखेर अटकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सचिन तेंडूलकरच्या मुलीचे म्हणजेच सारा तेंडूलकरचे खोटे ट्विटर अकाऊंट तयार करून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्य ट्विट केल्या प्रकरणी अंधेरीतून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पोलिसांनी अटक केले. आरोपीला अटक करताना त्याच्याकडून एक लॅपटॉप, 2 मोबाईल्स, राऊटर्स आणि कंप्यूटर्स असं साहित्य जप्त करण्यात आलं. नितीन शिसोडे असं त्या आरोपीचं नाव असून त्याला त्याच्या राहत्या घरून अंधेरीतून अटक केली आहे.

नितीन शिसोडे हा सॉफ्टवेअर इंजीनिअर असून तो लॅपटॉप, मोबाईल्स, कंप्यूटर्सच्या खरेदी-विक्रीचं काम करतो. फेक अकाऊंट तयार करणे आणि आक्षेपार्य ट्विट केल्या प्रकरणी आरोपीला 9 फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सचिन तेंडूलकरच्या पी.ए ने सचिन तेंडूलकरच्यावतीने नितीन शिसोडे विरोधात सायबर कंप्लेट केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या फेक अकाऊंटचा आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रीयांचा शोध घेतला.

‘प्रत्येकाला माहीत आहे की, शरद पवार यांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्य लूटला गेला. पण काहींनाच माहित आहे की, याचं केंद्र स्थान हे खुद्द शरद पवार होते’. असं @sarasachin_rt अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल होत.

sara-tendulkar-fake-account.png

 

पोलीस कंप्लेंट केल्यानंतर आम्ही तातडीने त्या अकाऊंटचा शोध घेतला. शोध घेताना आम्हाला नितीन शिसोडेच्या घरचा पत्ता हाती लागला. तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आम्हाला माहिती मिळाली की तो राऊटर आरोपीचाच होता. असं पोलिसांचे म्हणने होते. तर त्यावर आरोपीचे वकील अजय दुबे यांनी आपली प्रतिक्रीया दिली की ‘माझा क्लाईंट हा सेकेंड हेंड वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो व काही दिवसांपूर्वीच त्याचा लॅपटॉप चोरीला गेला. कदाचित तेव्हाच हा सगळा प्रकार घडला असेल’. पण, त्यांना न जुमानता पोलिसांनी  नितीन शिसोडेला अटक केली. सध्या, पोलिसांकडून नितीन शिसोडेचा लॅपटॉप फोरेंसिक लेबमध्ये टेस्टींगसाठी पाठवला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य