Sunday, 20 January 2019

मराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

105 दिवसांचा खेळ, 19 स्पर्धकांचा समावेश आणि असंख्य टास्क्स यामुळे नेहमी चर्चेत असलेला  'बिग बॉस 11'चा ग्रँड फिनाले रविवारी रात्री पार पडला. प्रत्येक सिझनप्रमाणे बिग बॉसचं यंदाचं पर्वही अनेक वादांमुळे गाजलं होतं.

हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देणाऱ्या शिल्पाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. अंगुरी भाभीजी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं आहे. 

रविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाने ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं. अभिनेत्री हीना खानच्या पदरात मात्र उपविजेते पदाच दान पडलं. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

biggboss2.jpg

शिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु होतीचं. अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहचली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वात लाडकी स्पर्धक ठरली होती.

बिग बॉसच्या अकरा पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मराठी स्पर्धकाला जेतेपद मिळालं. अर्थात शिल्पा शिंदेचा मराठीद्वेष्टेपणा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता.

“मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली.

biggboss3.png

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये पुनिश शर्मा आणि त्याची गर्लफ्रेण्ड बंदगी कालरा, हितेन तेजवानी, अर्शी खान, आकाश दादलानी यांच्या डान्सनी मंचावर चार चांद लावले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य