Wednesday, 16 January 2019

दारू पेक्षा धोकादायक ठरतोय चहाचा घोट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दिवसाला 5 ते 10 कप चह घेणाऱ्या टी लव्हर्सना एक सल्ला देणारी बातमी. सतत चहा घेतल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध हे विकार जडतात. भारतीयांचे चहातील साखरेचे प्रमाण हे सर्वाधीक असल्याने बैठे काम करणार्‍या व्यक्तींना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे भारतीय ओढले जातात .

*साखर, दूध आणि चहाची भूकटी उकळलेला चहा पिल्याने कफ-पित्त वाढते

*चहा हा उष्ण गुणांचा प्रमुख दर्शक म्हणून ओळखला जातो.

*चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

*सर्वाधिक आवडणा टपरी वरचा चहा हा अ‍ॅल्यूमिनियमच्या भांड्यात बनवला जातो. अ‍ॅल्यूमिनियम धातूचा खाद्यपदार्थांशी दीर्घकाळ संपर्क झाल्याने स्मृतीनाश सारखा असाध्य विकार होण्याचा संभव असतो.

*चहा चवीला गोड-तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो.

*काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे हे लोकांना माहीत असने गरजेचे आहे.

*नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात.

 *रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

*चहाबरोबर आपण दिवसभर खूप पदार्थ खातो. खाल्लेल्या पदार्थांमध्ये मीठ असल्यामुळे मिठाच्या खारटपणाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला हाणीकारक ठरतो.

loading...

Top 10 News

राशी भविष्य