Thursday, 17 January 2019

एक रुपयाची पहिली नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती; आता ही नोट झालेय 100 वर्षांची

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोणत्याही शुभमुहूर्तावर आपल्याला लागतो तो रुपया. शुभमुहूर्तावर मोलाच्या ठरणाऱ्या याच रुपयाची नोट शंभरीची झाली आहे. 1917 ला छापलेल्या ही नोट 1926ला बंद झाली. त्यानंतर पुन्हा 1940ला नोटेची छपाई करण्यात आली ती 1994ला बंद झाली.

त्यानंतर मागणीनुसार 2015पासून ही नोट पुन्हा चलनात आली.

असा आहे एक रुपयाच्या या नोटेचा इतिहास 

- ही नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती.

- इंग्रजांनी 30 नोव्हेंबर 1917 रोजी छापून बाजारात आणली

- सर्वात कमी किमतीची भारतातील पहिली नोट

- 2 वेळा छपाई थांबली, 28 वेळा बदल

- रिझर्व्ह बँकेमार्फत नाही तर भारत सरकारकडून छपाई होते

- रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची नाही, तर अर्थसचिवांची स्वाक्षरी असते

- कायद्यानुसार ही मुद्रा नोट आहे

loading...

Top 10 News

राशी भविष्य