Monday, 22 January 2018

तारीख लवकर ठरवा. लग्नांसाठी यंदा मुहूर्त कमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झालीय. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केलीय. विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे. कारण, पुढच्या वर्षी अर्थात २०१८ मध्ये अवघे ५२ विवाह मुहूर्त आहेत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल २० ते २२ कमी मुहूर्त आहेत.

ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. तसेच पौष महिन्यात अर्थात नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त नाही. तर, पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत असून तो १६ मे ते १३ जूनदरम्यान आहे. त्या कालावधीतही एकही विवाह मुहूर्त नाही. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News