Tuesday, 22 January 2019

महिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, वेब टीम

महिलांचा स्वभाव ओळखण अत्यंत कठीण काम असे सगळेच म्हणतात. मात्र, महिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच त्यांच्या स्वभावाची अनेक रहस्य दडली आहे.  

चेहरेपट्टी आणि शारिरीक बांध्यानुसार असा ओळखा महिलांचा स्वभाव

गोल चेहऱ्याच्या स्त्रीया

गोल चेहरा असलेल्या स्त्रीया भाग्यवान असल्याचे मानले जाते. तसेच त्यांचं जीवन अतिशय सुखमय असते. त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही.

 

चमकदार त्वचा आणि कोमल हात असलेल्या स्त्रीया

 चमकदार त्वचा आणि कोमल हात असलेल्या स्त्रीयांचा स्वभाव अतिशय विनम्र असतो. शिवाय त्या मनमिळाऊ आणि अति संवेदनशील असतात.

 कोरडे आणि सतत विस्कटलेले केस असलेल्या स्त्रीया

सतत विस्कटलेले आणि कोरडे केस असणाऱ्या स्त्रीयांचं जीवन सतत कष्टमय असते. त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी क्वचितदाच घडतात.

 

 गोल आणि चमकदार चेहरा असलेल्या स्त्रीया

पोर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा असलेल्या स्त्रीयांना वैभवशाली जीवन लाभतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसुन येते. त्यांचा स्वभावही उत्साही असतो.

गुलाबी हस्तरेषा असलेल्या स्त्रीया

गुलाबी हस्तरेषा असलेल्या स्त्रीयांच्या जीवनात सदैव सुख समृद्धि नांदते. पण हस्तरेषा जर काळ्या असतील तर मात्र त्या स्त्रीला कष्टमय जीवन व्यतित करावे लागते.

 

चमकदार आणि मोठे डोळे असलेल्या स्त्रीया

ज्या स्त्रीयांचे डोळे चमकदार, सुंदर आणि मोठे असतात, त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखकर असते. तसेच त्यांचे भाग्य प्रबळ असते.  

 

पायाचे तळवे असे असणाऱ्या स्त्रीया

ज्या स्त्रीयांच्या पायाची लहान आणि मोठी बोटे जमिनीला टेकत नाहित, त्यांचे जीवन तर सुखकर असतेच पण त्यांच्या आयुष्यातील माणसांचे जीवनही सुखकर होते.

 

खालचे ओठ जाड असणाऱ्या स्त्रीया

कंबरेपर्यंत लांब केस व बऱ्यापैकी मोठे, जाड ओठ असणाऱ्या स्त्रीयांचे वैवाहिक जीवन कष्टमय असते,शिवाय त्या सतत चिंताग्रस्त असतात.   

 

हातावर माळेसारखी खुण असणाऱ्या स्त्रीया

 हातावर माळेसारखी खुण असणाऱ्या स्त्रीया या कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ ठरतात. शिवाय त्यांच्या प्रगतीचा वेग इतरांच्या मानाने जास्त असतो.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य