Saturday, 17 November 2018

जास्त जांभई मोठ्या आजाराचेही कारण असू शकते

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जांभई देणे ही रोजच्या जीवनातील एक दैनंदिन क्रिया. घरी-ऑफिसमध्येही आपण सर्रास जांभई देत असतो. ऑफिसमध्ये जांभई दिल्यामुळे झोप आणि आळस येतो. कामात मन लागत नाही. पण, काही कारण करुन आपण जांभईला नियंत्रणात ठेऊ शकतो. तरीही जांभई नियंत्रणात येत नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. जास्त जांभई देणे हे मोठ्या आजाराचेही लक्षण असू शकते. साधारणत: झोप पूर्ण न झाल्याने जांभई येण्याचे कारण असते. 

 

या कारणांमुळेही जांभई येऊ शकते –

-    जांभई येण्यामागे मोठ्या आजाराचेही कारण असू शकते. लिव्हरमध्ये काही बिघाड असल्यासही जांभई देण्याचे प्रमाण सतत राहू शकते.

-    जास्त जांभई देणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि थायरॉईडची समस्या असल्याचे आढळून आले आहे.

-    ऑफसमध्ये कामाचा अती ताण किंवा कामाबद्दल अधिक विचार करत असाल तर हेही वारंवार जांभई देण्यामागचे कारण असू शकते.

-    कामाच्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला नेहमी कोणी ना कोणी जांभई देत असते, त्यांना बघूनही आपल्याला जांभई येऊ शकते. जे लाक जास्त जांभई देतात अशा लोकांपासून लांब        बसण्याचा प्रयत्न करा.

 

जांभई येत असल्यास असे ठेवा नियंत्रण -

-    रोज कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे पण जर तुम्हाला जांभई देण्याची सवय असेल तर पाणी जास्त प्यावे. जास्त पाणी पिण्यामुळे जांभई कमी येते.

-    जास्त जांभई येत असेल तर खुल्या हवेमध्ये फिरुन यावे. यामुळे ताजेतवाने वाटेल आणि शरीरात ऑक्सिजनची कमी होत असल्यास तीही भरुन निघेल.

-    जर तुम्हाला एखाद्या मिटींगला जायचे असेल तर डोकं शांत कसे राहिल याची काळजी घ्या. डोकं जास्त गरम झाले तर जांभई देण्याचे प्रमाणही जास्त होते.

-    जास्त जांभई देण्यामागचे कारण तुमची चुकीची डायट पध्दतीही असू शकते. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आहारात फळांचा अधिक समावेश असावा, फळांमध्ये      काकडी आणि टरबूज उत्तम पर्याय आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य