Monday, 19 November 2018

पाऊस आणि मका...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

पावसाळा आला की खव्व्यांना विविध पदार्थ खाण्याचे वेध लागतात. अनेक प्रकारच्या चविष्ट पदार्थांवर येथेच्छ ताव मारत खवय्ये आपल्या जिभेचे चोचले

पुरवतात.

 

 

तळलेली भजी, बटाटा वडा, विविध प्रकारचे चाट आदी पदार्थ खाण्याती जणू स्पर्धाच लागते.  पावसाळी वातावरणात मका अर्थात बुट्टा खाण्याची मजा

काही औरच असते. आगीवर भाजलेला मका, त्यावर लिंबाच्या फोडीने लावलेले लाल तिखट... नुसती कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटते.

 

भाजलेला मका, मक्याचे चाट, उकडलेला मका अशा विविध प्रकारचे पदार्थ पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करतात.

 

असा स्वादिष्ट आणि चवदार मका शरीरासाठी देखील तितकाच फायदेशीर आहे. मका खाण्याने शरीराला विविध प्रकारचे प्रोटीन्स मिळतात. तसेच अनेक

विकारांवरदेखील मका रामबाण उपाय आहे.

 

मका खाण्याचे फायदे

 

-  मका खाण्याने दात मजबूत होता

-  सर्दी आणि तापावरही मका फायदेशीर ठरतो.

- भाजलेला मका खोकल्यासाठी उपयुक्त आहे.

- मक्यामध्ये अँटी-ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्याने वाढत्या वयाची लक्षण रोखण्यास मदत होते

- कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर मका उपयुक्त ठरतो.

- मका लहान मुलांच्या मानसिक विकासावर अत्यंत महत्त्वाचे काम करतो.

- मक्यामध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असल्याने ह्रदय निरोगी राहते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य