Wednesday, 23 January 2019

आता गुगलला टक्कर देणार ‘हे’ भारतीय वेब ब्राउजर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

टेलिकॉम सेक्टर हादरवून टाकल्यानंतर रिलायन्स आता गुगलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले असून, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्सने स्वदेशी ब्राउजर लाँच केले आहे. तसेच भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे ब्राऊजर तयार करण्यात आला आहे. हे पहिले भारतीय वेब ब्राऊझर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रिलायन्स जिओने या ब्राउजरला नाव “JioBrowser” असे नाव दिले आहे.

इतर ब्राऊझर्सच्या तुलनेत “JioBrowser” हे अतिशय वेगवान आहे. या सोबतच जिओब्राऊझर वापरण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि योग्य रितीने काम करण्यासाठी याला अधिक मेमरी स्टोरेजचीही आवश्यकताही नाही. सध्या हा ब्राऊझर अँड्रॉइड यूजर्सनाच वापरता येणार आहे. पण हे ब्राउजर Apple iOSसाठी उपलब्ध नाही. स्वदेशी जिओ ब्राउजर गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे, आतापर्यंत 10 लाख जणांनी डाऊनलोड केले आहे.

यामध्ये व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा खजिना उपलब्ध आहे तसेच हा ब्राउजर 8 भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे, यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांचा समावेश आहे. या ब्राउजरवरुन एखाद्या वेबसाईटवर सरळ जाता येईल तसेच या ब्राउजरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हिडीओ आणि फोटो शेअर करू शकता. तसेच यावरुन तुम्हाला हिस्ट्री पेजवर जाऊन आपल्या डाऊनलोड फाइल्सचे नियंत्रण करता येणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW