Wednesday, 19 December 2018

गुगलकडून ‘डॉ. वर्जीनिया अपगार’ यांना मानवदंना...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गुगलने आज डॉक्टर ‘वर्जीनिया अपगार’ यांच्या 109 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत डूडल साकारले आहे. डॉ. वर्जीनिया अपगार या 'अपगार स्कोर’ बनवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. 'अपगार स्कोर’च्या माध्यमातून नवजात बालकांच्या आरोग्याबाबतची माहिती मिळवली जाते.

गुगलने आपल्या डूडलमध्ये डॉ. वर्जिनिया यांच्या हातात पेन आणि नोटपॅड दाखवला आहे. ज्यामध्ये डॉ. वर्जिनिया डूडलमध्ये असलेल्या एक नवजात बालकाच्या आरोग्याबाबतची माहिती नोट करत आहेत. गुगलने या डूडलच्या माध्यमातून ‘डॉ. वर्जीनिया अपगार यांची माहिती थोडक्यात दिली आहे.

डॉ. वर्जीनिया अपगार यांचा जन्म 7 जून 1909 मध्ये झाला होता. डॉ. वर्जीनिया या कोलंबिया यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ फिजिशियन अॅन्ड सर्जन्समध्ये प्रोफेसर बनणाऱ्या पहिली महिला आहेत.

डॉ. वर्जीनिया अपगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1950 मध्ये नवजात बालकांच्या आरोग्याबाबतची माहिती मिळवली आणि त्यानंतर 1960 पर्यंत नवजात बालकांच्या जन्मानंतर 24 तासाच्या आत त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती मिळवणे सोपे झाले. 1972 मध्ये डॉ. वर्जीनिया यांनी 'Is My Baby All Right?' नावाचं पुस्तक लिहण्यात आपलं मोठ योगदान दिलं आहे. डॉ. वर्जीनिया अपगार यांचा मृत्यू 1974 मध्ये झाला.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य