Saturday, 17 November 2018

फेसबुकनं केली, 5 कोटी युजर्सची माहिती लीक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लंडन

सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जगातील सर्वाधिक वापरात येणारी आणि मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखलं जाणाऱ्या फेसबुकला आता नव्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. लाखो लोकांनी त्यांचे फेसबुक अकाउंट बंद केले आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे.

अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात 5 कोटी युजर्सची व्यक्तीक माहिती फेसबुककडून 'केंब्रिज अॅनालिटिका' कंपनीला पुरवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या लीक झालेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला असा देखील आरोप आहे. केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला 5 कोटी युजर्सची माहिती पुरविल्याप्रकरणी ब्रिटनच्या संसदीय समितीने मंगळवारी 'फेसबुक'चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना समन्स बजावले आहे. 

या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे. सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य