Saturday, 17 November 2018

एअरटेलच्या भागीदारीतून भारतात 5G; भन्नाट स्पीड पाहून अचंबित व्हाल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतात 5G चे प्रेजेंटेशन झाले आहे. भारतात नवीन 5G सुविधा निर्माण करण्यासाठी एरिक्सनने पहिल्यांदाच एंड टू एंड सादरीकरण केलं.

एअरटेलशी भागीदारी करुन एरिक्स भारतात 5G ची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

हे सादरीकरण एरिक्सनच्या 5G टेस्ट बेड आणि 5G न्यू रेडिओ (एनआर) कडून करण्यात आलं.

ज्यामध्ये अत्यंत कमी वेळेत म्हणजे 3 मिली सेकंदात 5.7 गीगा बाईट प्रती सेकंद एवढं स्पीड मिळालं.

5G ची सुरुवात झाल्यानंतर भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये 2026 पर्यंत 27.3 अब्ज महसूल निर्माण करण्याची क्षमता असल्याचं एरिक्सनच्या अभ्यासात म्हटलं आहे.

भारत सरकारने 2020 पर्यंत 5G ची सुरुवात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचं एरिक्सनने म्हटलं आहे. दरम्यान सरकारने यासाठी काही दिवसांपूर्वीच एका समितीची स्थापना केली आहे, जी 5G सेवा भारतात आणण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य