Monday, 22 January 2018

फक्त तीन मिनीटांत MI च्या दीड लाख फोन्सची विक्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

शाओमीने Redmi Y1 आणि Redmi Y1 Lite हे दोन फोन भारतात लाँच केले. बुधवार या फोन्सचा पहिला ऑनलाईन सेल होता. यावेळी फक्त तीन मिनटांत दीड लाख फोन विक्रिला गेल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या फोनचा पुढचा सेल 15  नोव्हेंबरला होणार आहे.

Redmi Y1 च्या 32GB व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. तर, 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.  Redmi Y1 Lite ची किंमत 6,999 रुपये इतकी आहे.

शाओमी रेडमी Y1 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल आहे. याशिवाय याला गोरील्ला ग्लास प्रोटेक्शनही असणार आहे. यामध्ये ऑक्टोकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 435 आणि 3 जीबी / 4 जीबी रॅम व्हेरिएंटही आहेत.

Redmi Y1 या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये फ्लॅशसहित 16  मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे. तर याची बॅटरी 3080 mAh क्षमतेची आहे.

रेडमी Y1 प्रमाणेच रेडमी Y1 लाइटमध्ये फीचर्स असणार आहेत. मात्र, यामध्ये स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी असणार आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jan 22 06:42:36 +0000 2018

अजित पवारांनी घेतला चंद्रकात पाटलांचा समाचार - https://t.co/e6CPBQoniF @MarathiBrain @marathivichar @MarathiRT… https://t.co/cYpgz7WAXE
Jai Maharashtra News
Mon Jan 22 06:36:38 +0000 2018

बालकालाकार प्रफुल्ल भालेरावचा अपघाती मृत्यू - https://t.co/VMOQi7DeeF @dhananjay_munde @PiyushGoyal @WesternRly… https://t.co/4OrlS2Qwnq