Wednesday, 12 December 2018

नोकियाचा पाचवा अँड्रॉईड फोन लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

 

नोकियाने भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. जबरदस्त बॅटरी बॅकअप हे या फोनचे वैशिष्ट्य आहे.  

 या फोनमध्ये 4100mAh क्षमतेची बॅटरी आहे. विशेष म्हणजे साडे सात हजार रुपयांच्या आसपास या फोनची किंमत असेल. या फोनची बॅटरी दोन दिवस बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे.

भारतीय बाजारात लाँच झालेला हा नोकियाचा पाचवा अँड्रॉईड फोन आहे. कंपनीने सर्वात अगोदर नोकिया 6, नोकिया 3 आणि नोकिया  5 लाँच करण्यात आला.

त्यानंतर फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 आणि आता नोकिया 2 लाँच करण्यात आला. आतापर्यंत नोकिया 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. मात्र आता त्याची जागा नोकिया 2 ने घेतली आहे.

 

नोकिया 2 चे फीचर्स

- 5 इंच आकाराची स्क्रीन

- 4100mAh क्षमतेची बॅटरी

- 1.3GHz क्वाड कोअर प्रोसेसर

- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

- 1GB रॅम

-8GB स्टोरेज

loading...

Top 10 News

राशी भविष्य