Thursday, 15 November 2018

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी बॅड न्यूज; डेटा प्लान महागणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक बॅड न्यूज आहे. जिओचा डेटा प्लान महागणार आहे.  

आजपासून जिओनं प्राईम पोस्टपेड डेटा प्लॅनमधल्या शुल्कामध्ये वाढ केली आहे.

जिओनं पोस्टपेड आणि प्रीपेड प्राईम प्लॅनमध्ये बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार 309 रुपयांमध्ये 60 जीबी मिळणारा डेटा, आता केवळ 30 जीबी मिळणार आहे. तसेच 509 मध्ये मिळणारा 120 जीबी डेटा, आता केवळ 60 जीबी डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओनं 84 दिवसांच्या डेटा प्लानमध्ये तब्बल 15 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीनुसार 84 दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 459 रूपये मोजावे लागणार आहेत. ज्यामध्ये ग्राहकाला दिवसाला 1 जीबीचा 4जी डेटा वापरता येणार आहे.

दुसरीकडे जिओनं एक खास ऑफरही आणली आहे. जिओने अवघ्या 52 रुपयांमध्ये एका आठवड्यासाठी, तर 98 रुपयांमध्ये 2 आठवड्यांसाठी फ्रि व्हॉईस, एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा पॅक उपलब्ध करुन देणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य