Saturday, 22 September 2018

ऑनलाईन पेमेंटमध्ये आता गुगलची एंट्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आता गुगलने उडी मारली आहे. गुगलची ‘तेज’ या नावाची युनिफाइड पेमेंट इंटरफेस आधारित डिजिटल पेमेंट सेवा भारतात सुरु होणार आहे.

 

18 सप्टेंबर रोजी दिल्लीत गुगलच्या तेज चे लॉंचिंग होणार आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंट क्षेत्रात झपाट्याने वाढत होत आहे. त्यात आता गुगलने आपले स्थान बळकावले आहे.

 

‘आम्ही ग्राहकांच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. म्हणून आम्ही भारतात आमचे नवे उत्पादन सादर करीत आहोत, तसेच ‘तेज’  हे ‘मेक इन इंडिया’ चे उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’ प्रमाणे ते काम करणार आहे.

 

तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक  म्हणून गुगलने हे नाव निवडले’,  असे कंपनीने म्हटले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 07:37:58 +0000 2018

बाप्पाच्या विसर्जनाला मुंबई सज्ज असे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन वाहनधारकांनोे उद्या इथे फिरकू नका नियोज… https://t.co/elwjWVfCGa
Jai Maharashtra News
Sat Sep 22 07:18:02 +0000 2018

विसर्जनासाठी मुंबई सज्ज. उद्या हे मार्ग राहणार बंद पाहा ट्रफीकच्या विविध उपाययोजना https://t.co/xExGgrIUTf… https://t.co/abFykSOHRQ

Facebook Likebox