Friday, 18 January 2019

नवीन स्मार्टफोन घेताय ? पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट !

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

- सॅमसंगने 6GB ऱॅम आणि 128GB स्टोरेजवाला स्मार्टफोन गॅलेक्सी S8 पल्स जूनमध्ये 74,900 रुपयांना लॉंच केला होता. पण आता या फोनवर 10,000 रुपयांची सूट दिली असून आताची किंमत 64,900 एवढी आहे. 6.2 इंची क्वाड HD+ इनफिनिटी डिस्प्ले असून 12MP च्या दोन बॅक कॅमेरासह, 8MP चा फ्रंट ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे.  

vfcon079861.jpg

 

- एलजीने V20 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विक्रीसाठी आणला होता. भारतात या फोनची किंमत 54,999 रुपये होती. आणि आता या फोनच्या दरात तब्बल 25000 रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांत उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये 5.7 इंची QHD डिस्प्ले आणि 2.1 इंचीचा सेकेंड्री डिस्प्ले दिला आहे. क्लालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर सोबतच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजही देण्यात आले आहे. 

LG_V20.jpeg

 

- लॉंचिंगच्या फक्त 6 महिन्यांनंतर वीवो V5 प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीवर थेट 4000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. आणि याची किंमत आता 22,990 रुपये एवढी आहे. या फोनच्या फ्रंटला ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंटचा एक कॅमेरा 20MP आणि 8MP आहे तर बॅक कॅमेरा 13MP दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर दिला असून यासोबतच 4GB रॅम दिला आहे. या फोनला 32GB इंटरनल स्टोरेज, 3 आणि 5.5 इंचीचा HD डिस्प्ले तर 3,055mAH  बॅटरी दिली आहे.

vivo-v5-plus.jpg

 

- नूबिया Z17 हा 21,899 रुपयांना लॉंच केला होता पण आता या फोनची किंमत 18,899 रुपयांवर आली आहे. नूबिया 17 मिनीमध्ये 5.2 इंची HD डिस्प्ले दिला असून क्वालकॉम 652 प्रोसेसर आहे. अन्ड्रोइड 6.0 मार्शमेलो, 2,590 mAH  बॅटरीसह ड्यूल बॅक कॅमेराही दिला आहे.

zte-nubia-z17.jpg

 

- सॅमसंग गॅलेक्सी A7 ची किंमत 7,500 रुपयांनी खाली उतरली असून आता 25,900 रुपयांना याची विक्री होत आहे. हा फोन 33,490 रुपयांना लॉंच करण्यात आला होता. सॅमसंग गॅलेक्सी A7 5.7 इंची HD डिस्प्ले आहे. या फोनला 3GB रॅम तर 16MP फ्रंट आणि बॅक कॅमेरा दिला आहे. अड्रोइड 6.0 मार्शमेलोसह 3,600mAH चा बॅटरी बॅकअप दिला आहे.

Samsung-Galaxy-A7-938.jpg

 

- सॅमसंग गॅलेक्सी A5 स्मार्टफोन 2017मध्ये 28,900 रुपयांना लॉंच केला गेला होता. आणि आता हा स्मार्टफोन 22,900 रुपयांना मिळतो आहे. या ड्यूल सिम स्मार्टफोनला अड्रोइड 6.0 मार्शमेलो, 5.2 इंच HD डिस्प्ले, 3GB रॅमसह ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 32GB इंटरनल स्टोरेज, 16MP बॅक आणि फ्रंट कॅमेरा तर 3000mAH  बॅटरी दिली आहे. 

samsung_galaxy_a5_.jpeg

- ZTE कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नूबिया Z11 स्मार्टफोन लॉंच केला होता. 29,999 रुपयांना लॉंच झालेल्या या फोनची किंमत आता 25,999 एवढी आहे. 5.5 HD डिस्प्ले, अड्रोइड 6.0 मार्शमेलो, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोससर, 6GB रॅमसोबत 64GB एक्सपान्डेबल स्टोरेज दिला आहे. या ड्यूल स्मार्टफोनमध्ये 16MP बॅक तर 8MP फ्रंट कॅमेरासह 3000mAH बॅटरी देण्यात आली आहे.

NUBIA_Z_11.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jan 18 16:14:06 +0000 2019

महिलांवर केमिकल हल्ला करणारा विकृत अटक... तंग कपडे घालणाऱ्या महिलांच्या कंबरेखाली टाकायचा केमिकल अंधेरी स्टेशनवरून… https://t.co/f5wSKF05TL
Jai Maharashtra News
Fri Jan 18 15:50:13 +0000 2019

#Poll- मणिकर्णिका सिनेमावरून करणी सेनेने हिंदू धर्माच्या अपमानाचा मुद्दा करत कंगना राणावतला अॅसिड हल्ल्याची धमकी दि… https://t.co/zuzn0JtGXO