Sunday, 20 January 2019

आशिया चषक स्पर्धेत भारतानं पाकला असं लोळवलं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा तब्बल ८ गडी आणि २१ षटकं राखून विजय मिळवलाय.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी सहज पार केलं.

कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर रोहित शर्मा शादाब खानच्या गोलंदाजीवर बाद झाला.तर फईम अश्रफने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं आव्हान अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक जोडीने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

फईम आणि शादाबचा अपवाद वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. त्याआधी भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १६२ धावांमध्ये कोलमडला.

#AsiaCup2018 भारताचे अर्धशतक, 162 धावांत पाकिस्तान गारद

भारत- पाक सामन्यासाठी मोजावी लागणार ‘एवढी’ रक्कम!

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card