Wednesday, 12 December 2018

मास्टर ब्लास्टरची BMW विकत घ्यायची का? तर वाचा हे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आता मास्टर ब्लास्टरची BMW विकत घेता येणार आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ही संधी उपलब्ध करण्यात आल्याचं सांगण्यात येतयं. सचिन तेंडूलकर याने 2002 मध्ये खरेदी केलेली निळ्या रंगाची BMW X5 ही कार लिलावात उपलबद्ध आहे. 

  • सचिनने २००२ मध्ये BMW X5 खरेदी केली होती. 
  • विकत घेतल्यानंतर काही दिवसांनंतर सचिनने BMW कार विकली होती.
  • त्यानंतर ती आतापर्यंत तीन वेळा विकली गेली होती.
  • सचिनची ही BMW X5 आता चौथ्यांदा लिलावत विक्रीसाठी आली आहे.
  • भारतामध्ये दुर्मीळ असणाऱ्या निळ्या रंगाच्या या BMW X5 ची किंमत २१ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
  • आतापर्यंत ही कार ७२ हजार किलोमीटर धावली आहे तर इंजिन बुलेटप्रुफ मॅटिरिअलने तयार झालेले आहे. 

BMW X5M ची वैशिष्ट्ये - 

  • BMW X5M एसयूव्ही मध्ये 4.6S किंव्हा ४,६१९ सीसीचे व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे.
  • सात सेकंदामध्ये BMW X5 ही गाडी १०० किलोमीटर धावू शकते.
  • पाच ऑटोमॅटीक गिअर वाली BMW X5 ताशी २३९ किलीमीटरने धावते.

सचिन तेंडुलकरने वापरलेली BMW X5 ही कार खऱेदी करायची असल्यास Acierto Multi trade PVT. Limited यांच्याशी संपर्क करा.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card