Wednesday, 16 January 2019

मास्टर ब्लास्टर परदेशात देणार क्रिकेटचे धडे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारत आणि क्रिकेट हे नाते अतूट आहे. भारतात क्रिकेट हा खेळ अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना प्रिय आहे. तर सर्वजण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देवता मानतात.

सचिनचे नाव कायमच जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्याची क्रिकेट कारकीर्द हि प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी प्रेरणादायी आहे.

पण आता फक्त भारतातच नाही, तर देशाबाहेरील युवा क्रिकेटपटूंना सचिनचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने चक्क भारतात नव्हे तर विदेशात क्रिकेट अकादमी उभारली आहे.

सचिन तेंडुलकरनं स्वत: आपल्या ट्विटवरून याबाबतची माहिती दिली आहे.

आपल्याकडे असलेले गुण आणि कौशल्य याचा युवा खेळाडूंना फायदा व्हावा, या विचाराने प्रेरित होऊन सचिननं हा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडमधील मिडलसेक्स क्लबबरोबर करार करत सचिनने एक अकादमी उभारली आहे. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card