Tuesday, 13 November 2018

#FifaWorldCup2018 क्रोएशियावर 4-2 ने मात करत फ्रान्सने दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मॉस्को येथे रविवारी फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दमदार लढतीत पार पडला. या सामन्यात फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 ने मात करत विजेतेपद पटकावले.

विश्वचषकाच्या या रंगतदार अंतिम सामन्यात विजेत्या फ्रान्सने 4 तर उपविजेत्या क्रोएशियाने 2 गोल मिळवले, त्यामुळे एकूण 6 गोलांसह या लढतीत एक नवा विक्रम नोंदवला गेला.

या अंतिम सामन्यात एकूण 6 गोल नोंदवले गेले. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 32 वर्षांनंतर पहिल्यांदा 4 पेक्षा अधिक गोल नोंदवण्यात आले आहेत.

यापूर्वी 1986 साली अर्जेंटिना आणि जर्मनीमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकूण 5 गोल नोंदवण्यात आले होते.

त्यावेळी अर्जेंटिनाने जर्मनीला 3-2 अशा फरकाने मात दिली होती. तर 1982 च्या विश्वचषकात इटलीने जर्मनीवर 3-1 ने मात केली होती.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card