Wednesday, 16 January 2019

#FifaWorldCup2018 आईसलँडवर विजय, क्रोएशियाचं ' ड ' गटात प्रथम स्थान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत फुटबॉल विश्वचषकातील ' ड ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे. इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाला हा विजय मिळवता आला. 

सामन्याच्या 53व्या मिनिटाला गोल करत पर्सिकने क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण आईसलँडने या गोलचा वचपा काढला. सामन्याच्या 76व्या मिनिटाला सिग्युर्डसनने स्पॉट किकवर गोल केला आणि संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.

सामन्याची निर्णायक 90 मिनिटे संपायला काही अवधी शिल्लक होता. तेव्हा क्रोएशियाने जोरदार आक्रमण लगावले आणि यामध्ये त्यांना यशही आले.

  • पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश मिळाले नाही.
  • पण दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे लगावली.
  • यामध्ये क्रोएशियाला प्रथम यश मिळाले.
  • क्रोएशियाच्या मिलान बॅडेल्जने 53व्या मिनिटाला गोल केला होता.
  • त्यानंतर आईसलँडच्या गिल्फी सिग्युर्डसन 76व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली होती.
  • पण त्यानंतर पर्सिकच्या निर्णायक गोलमुळे क्रोएशियाने विजय मिळवला.
  • सामन्याच्या 90व्या मिनिटाला पर्सिकने निर्णायक गोल करत क्रोएशियाला विजय मिळवून दिला.

#FifaWorldCup2018 अर्जेंटिनाची नायजेरियाला नमवत बाद फेरीत धडक

#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले

#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card