Tuesday, 20 November 2018

#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषकाच्या अ गटात उरुग्वेने रशियाचा 3-0 असा धुव्वा उडवला.

लुई सुआरेझच्या जोरावर उरुग्वेने अव्वल स्थान मिळवलं. रशियाला या पराभवासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

उरुग्वे आणि रशियाने गटात लागोपाठ दोन सामने जिंकून, बाद फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं होतं. त्या दोन संघांमधला सामना हा गटातला पहिला आणि दुसरा क्रमांक निश्चित करण्यासाठी होता.

  • या सामन्यात लुई सुआरेझने दहाव्या मिनिटाला उरुग्वेचं खातं उघडलं.
  • मग रशियाच्या डेनिस चेरीशेव्हने स्वयंगोल करून उरुग्वेच्या खात्यात भर घातली.
  • उरुग्वेच्या एडिसन कावानीने एन्जुरी टाईममध्ये तिसरा गोल डागला.
  • त्यामुळे उरुग्वेला 3-0 असा विजया साजरा करता आला.

#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला

#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...

#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card