Monday, 21 January 2019

#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत जपान आणि सेनेगल संघांमधला 'ह' गटातला दुसरा सामना 2-2 असा बरोबरीने पार पडला. या सामन्यात 1-2 या फरकानं मागे असताना शेवटच्या काही क्षणात हा सामना ड्रॉ राखण्यात जपानला यश मिळालं. सेनेगलच्या सादिओ मॅनेनं 11 व्या मिनिटाला गोल करत सेनेगलला आघाडी मिळवून दिली.

मात्र ताकाशी इनुईनं 34 व्या मिनिटाला 15 मीटरवरुन चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत जपानला बरोबरीवर पोहचवण्यात यश मिळवलं.

71 व्या मिनिटाला सेनेगलच्या मौसा वेगनं दुसरा गोल केला, आणि त्यामुळे सेनेगल या सामन्यात जिंकणार असं वाटत असतानाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या केईसुक होंडानं जपानला 2-2 अशा बरोबरीवर पोहचवलं.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card