Sunday, 20 January 2019

भारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘कबड्डी मास्टर्स 2018’ मध्ये भारतीय संघाने 6 देशांमध्ये सुरु असलेल्या कबड्डी मास्टर्स ची सुरुवात दमदार यशासह केली आहे. कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानचा 36-20 असा पराभव केला आहे.

सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने यशस्वी रेड्स करत पाकिस्तानच्या संघावर जोरदार आक्रमण केले. कर्णधार अजय ठाकूरने दमदार खेळी करत भारतासाठी 8 गुण मिळवले. तर पाकस्तानी संघ मात्र हतबल पाहायला मिळत होता.

भारताने रेड्सद्वारे 15 गुण मिळवले तर पाकिस्तानी रेड्सर्सनी अवघे 9 कमावले. ‘कबड्डी मास्टर्स 2018’ मध्ये विश्वचषक विजेता भारतीय संघ जेतेपदाचा दमदार दावेदार मानला जात आहे. भारताच्या मजबूत डिफेन्सने पाकिस्तानी संघाला पराभव सहन करावा लागला.

#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...

#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card