Thursday, 17 January 2019

#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

क्रोएशियाने यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदवताना बलाढ्य अर्जेंटिनाला ३-० असे नमविले. निझनी नोवगोरोद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाच्या तुफानी वादळाला सामोरे जावे लागले.

अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाची बचावफळी सपशेल अपयशी ठरली.

  • अँटे रेबिक कर्णधार लुका मॉड्रिक आणि इवान रॅकितिक यांच्या शानदार गोलच्या जोरावर विजय
  • ५३व्या मिनिटाला रेबिकच्या वेगवान गोलमुळे क्रोएशियाला आश्चर्यकारक १-० अशी आघाडी
  • क्रोएशियाच्या पहिल्या गोलनंतर अर्जेटिनाच्या आक्रमकता वाढली
  • क्रोएशियानेही त्याच आक्रमकतेने उत्तर दिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी ३ पिवळ्या कार्डसला सामोरे जावे लागले
  • ८०व्या मिनिटाला मॉड्रिकच्या गोलनंतर रॅकितिक यानेही गोल करत क्रिएशियाचा दणदणीत विजय निश्चित केला

 या अनपेक्षित पराभवासह जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाच्या बाद फेरीच्या आशा खूप धुसर झाल्या आहेत. या शानदार विजयासह क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषकात बाद फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून मान मिळवला.

#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी

#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..

#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card