Friday, 18 January 2019

#FifaWorldCup2018 सातव्या दिवशी आज हे तीन सामने रंगणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा वर्ल्डकपच्या सातव्या दिवशी आज तीन सामने रंगणार आहेत.पोर्तुगाल विरुद्ध मोरक्को, उरुग्वे विरुद्ध सौदी अरेबिया आणि इराण विरुद्ध स्पेन एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत.

पोर्तुगालसमवेतच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने स्पेनचा संघ अद्याप विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच आज इराणविरुद्ध होणारी लढत ही स्पेनची विश्वचषकातील वाटचाल ठरवणारी निर्णायक लढत ठरणार आहे.

उरुग्वे संघाला आपल्या प्रेक्षणीय खेळाने अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून देणारा लुईस सुआरेझ बुधवारी एका ऐतिहासिक सामन्याकडे वाटचाल करणार आहे.

कारकीर्दीतील १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला सुआरेझ उरुग्वेला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, यात शंका नाही. त्यामुळेच सौदी अरेबियासारखा तुलनेने कमकुवत संघ त्याला कसा रोखतो, हे पाहणे रंजक ठरेल.

पहिल्याच सामन्यात आपल्या जादुई खेळाने छाप पाडणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा स्वबळावर पोर्तुगालला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात रोनाल्डो मोरोक्कोला कशाप्रकारे हादरे देतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मोरोक्कोला मात्र या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल, अन्यथा विश्वचषकातील त्यांचा डाव साखळीतच संपुष्टात येईल.

#FifaWorldCup2018 बलाढ्य कोलंबियाला नमवतं जपानचा 2-1 असा विजय

#FifaWorldCup2018 सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश...

#FifaWorldCup2018 सलग दुसऱ्या सामन्यात रशियाची इजिप्तवर 3-1 ने मात....

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card