Tuesday, 22 January 2019

#FifaWorldCup2018 बलाढ्य कोलंबियाला नमवतं जपानचा 2-1 असा विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फुटबॉल विश्वचषकातील कोलंबियावर 2-1 असा विजय मिळवत जपानने इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात जपान हा आशियातील असा पहिला देश ठरला आहे, की ज्या देशाने दक्षिण अमेरिकेतील देशाला पहिल्यांदा पराभूत केले आहे.

यापूर्वी आशियामधील एकाही देशाला दक्षिण अमेरिकेतील संघांना पराभूत करता आले नव्हते. 

सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर शिन्जी कागावाने गोल डागून जपानचं खातं उघडलं. युआन क्वान्टेरोनं ३९व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर कोलंबियाला बरोबरी साधून दिली. पण युया ओसाकोनं ७३व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं बरोबरी तोडत जपानला एक सनसनाटी विजय मिळवून दिला.

दरम्यान, बचावपटू कार्लोस सांचेझला लाल कार्ड मिळाल्यानं कोलंबियाला या सामन्यात ८६ मिनिटं दहा खेळाडूंनी खेळावं लागलं. japan-won-opening-match-against-colombia-in-fifa-worldcup

#FifaWorldCup2018 सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश...

#FifaWorldCup2018 सलग दुसऱ्या सामन्यात रशियाची इजिप्तवर 3-1 ने मात....

 

loading...

राशी भविष्य