Wednesday, 16 January 2019

#FifaWorldCup2018 सलग दुसऱ्या सामन्यात रशियाची इजिप्तवर 3-1 ने मात....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात रशियाने इजिप्तवर 3-1 ने मात केली. विश्वचषकातील रशियाचा हा लागोपाठ हा दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह 6 गुण कमावत रशिया अ गटात अव्वल स्थानावर आहे.

मध्यंतरापर्यंत रशियाला गोल नोंदविण्यापासून दूर ठेवणा-या इजिप्तने उत्तरार्धातील खेळ सुरू होताच सामन्यातील ४७ व्या मिनिटाला स्वयं गोल करीत रशियाचे खाते उघडून दिले.

या सामन्यात सर्वांचं लक्ष इजिप्तच्या मोहम्मद सलाहकडे लागलं होतं. मात्र त्याला या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही.

पहिल्या सामन्यात इजिप्तला उरुग्वेविरुद्ध ९०व्या मिनिटाला झालेल्या गोलमुळे पराभव स्वीकारावा लागला होता.

#FifaWorldCup2018 बेल्जियमचा विजय, पनामाचा ३-० ने धुव्वा

#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार

 

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card