Thursday, 17 January 2019

#FifaWorldCup2018 बेल्जियमचा विजय, पनामाचा ३-० ने धुव्वा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

बलाढ्य बेल्जियमच्या ड्रिएस मर्टन्सनं 47व्या मिनिटाला केलेल्या गोलनं बेल्जियमचं खातं उघडलं आणि विश्वचषक मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. बेल्जियमने पनामाचा 3-0 असा धुव्वा उडवून आपल्या विश्वचषक मोहिमेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

ग गटातल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. 47व्या मिनिटाला पहिला गोल आणि ६९ व्या मिनिटाला केविन डी ब्र्यूएनाच्या जबरदस्त पासवर रोमेलू लुकाकूनं बेल्जियमसाठी दुसरा गोल डागला. सहा मिनिटांनंतर इडन हझार्डनं दिलेल्या पासवर लुकाकूने पनामाचा गोलकीपर पेनेडोला चकवून बॉल थेट जाळ्यात धाडला आणि  बेल्जियमला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

बेल्जियमचा संघ गेल्या 20 सामन्यांत अपराजित, 20 पैकी 15 सामन्यांत बेल्जियमनं मिळवला विजय, तर बेल्जियमचे पाच सामने बरोबरीत सुटले, सप्टेंबर 2016 साली बेल्जियमला स्पेनकडून 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. 

इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार

#FifaWorldCup2018 स्वीडनचा दक्षिण कोरियावर विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card