Sunday, 18 November 2018

#FifaWorldCup2018 स्वीडनचा दक्षिण कोरियावर विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंंस्था, दिल्ली

रशियातल्या फिफा विश्वचषकात स्वीडननं दक्षिण कोरियाचा १-० असा पराभव करून विजयी सलामी दिली. विश्वचषकातला सलामीचा सामना जिंकण्याची स्वीडनची गेल्या साठ वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे.

१९५८ सालच्या विश्वचषकात स्वीडननं मेक्सिकोचा ३-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर सात विश्वचषकांत स्वीडनला सलामीचा सामना कधीच जिंकता आला नव्हता.

अखेर रशियातल्या विश्वचषकात ती मालिका खंडित झाली. आंद्रियास ग्रानक्विस्टनं ६५व्या मिनिटाला पेनल्टी किकवर केलेल्या गोलच्या जोरावर स्वीडनचा विजय निर्णायक ठरला.
 
 
loading...

राशी भविष्य

Cricket Score Card