Sunday, 18 November 2018

#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 - 0 ने विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विश्वचषकाच्या सामन्यात अलेक्झांडर कोलारोव्हनं फ्री किकवर मारलेल्या गोलने सर्बियाला कोस्टा रिकावर 1 – 0 असा विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात सर्बिया आणि कोस्टा रिका या दोन्ही संघांनी एकमेकांच्या बरोबरीने खेळ केला.

त्यामुळे या सामन्यात तब्बल 56 मिनिटं बरोबरी तुटु शकली नव्हती. अखेर 56 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर कोलारोव्हनं सामन्यातला एकमेव गोल मिळवला.

कोलारोव्हनं 25 मीटर्सवरून मारलेल्या किकने चेंडू ज्या वेगानं गोलपोस्टमध्ये जाऊन धडकला, तो वेग त्याच्या डाव्या पायातल्या ताकदीचा अंदाज देणारा होता. कोस्टा रिकाचा गोलरक्षक केलोर नवासला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये आदळला, त्या वेळी प्रेक्षक थक्क झाले होते.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card