Tuesday, 22 January 2019

#FiFaWorldCup2018 अर्जेंटिना आणि आईसलँडची बरोबरी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि आईसलँडमध्ये सामना रंगला. ड’ गटाच्या या सामन्यात माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून आईसलँडने दणक्यात पदार्पण साजरे केले.

आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉसन हे ठरले. अर्जेंटिनासाठी स्टार लियोनेल मेस्सीने ६४ व्या मिनिटाला गमावलेली पेनल्टी ही विजयापासून वंचित ठेवणारी ठरली.

अर्जेंटिनाचा संघ गेल्या तीन विश्वचषक स्पर्धात आपल्या गटात पहिल्या स्थानी राहिला आहे परंतु आज विजय हुकल्यावर त्यांची ही मालिका यंदा खंडीत होण्याची भिती आहे. याशिवाय अर्जेंटिनाने गेल्या सहा विश्वचषकात आपला सलामी सामना जिंकून विजयी सुरूवात केली होती, ती परंपरासुद्धा आज खंडीत झाली. 

आईसलँडने निश्चितपणे या सत्रात दमदार खेळ करून मने जिंकली.अगुरो आणि फिन्नबॉगसन यांच्या गोलांमुळे सामना मध्यंतरावेळी १-१ बरोबरीत होता. मात्र बरोबरीनंतरही दोन्ही संघ एकमेकांवर भारी पडल्याने त्यांना दुसरा गोल करता आला नाही.

#FiFaWorldCup2018 डुक्कराने केली उपांत्य फेरीची भविष्यवाणी...

#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...fifa-world-cup-2018-messi-misses-kick-argentina-penalty

loading...

राशी भविष्य