Wednesday, 16 January 2019

#FiFaWorldCup2018 डुक्कराने केली उपांत्य फेरीची भविष्यवाणी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरु झाली असून या स्पर्धेतील चार सामने आतापर्यंत झाले आहेत. पंरतू भविष्य जाणणाऱ्या डुकराने आताच Fifa world cup 2018 मध्ये कोणते ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे सांगून दिले आहे.

या डुकराचे नाव मिस्टिक मार्कस असे असून ते डुक्कर आठ वर्षांचे आहे. मार्कसचे आतापर्यंतचे सर्व अंदाज हे तंतोतंत खरे ठरले आहेत. या डुकराने Fifa world cup 2018 मधल्या उपांत्य फेरीचा कोणते-कोणते संघ पल्ला गाठतील याचे भविष्य वर्तवले आहे. प्रत्येक फळाला सर्व देशांचे झेंडे लावलेले असतात आणि हा डुक्कर झेंडे लावलेल्या फळांची निवड करतो, आणि हीच त्याची निवड भविष्यवाणी ठरत आहे. 

मार्कसच्या पुढ्यात ३२ फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर Fifa world cup 2018 मध्ये सहभागी झालेल्या ३२ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जीयम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे निवडली. त्यामुळे हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असा मार्कसने अंदाज व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे या डुकराने २०१४ साली झालेल्या Fifa world cup स्पर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्यदेखील आधीच सांगितले होते. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी मार्कसने डोनाल्ड ट्रम्प जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर ‘ब्रेक्झिट’च्या मतदानाच्या वेळीदेखील ब्रिटन वेगळे होण्याच्या बाजूने मार्कसने कौल दिला होता.

#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...

#FiFaWorldCup2018 मोरॅक्कोचा स्वयंगोल, इराणचा विजय

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card