Tuesday, 22 January 2019

#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये  पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिली हॅटट्रिक केली. रोनाल्डोच्या या हॅटट्रिकच्या जोरावरच पोर्तुगालने फिफा विश्वचषकाच्या ग्रुप बी मधील सामन्यात स्पेनला 3-3 असं बरोबरीत रोखलं. पोर्तुगाल आणि स्पेन संघांमधल्या या सामन्यात क्रीडारसिकांना फुटबॉलचा निखळ आनंद मिळवून दिला.

गेल्या तीन विश्वचषकांनंंतर रोनाल्डोने आज स्पेनविरुद्ध जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. 

फिश्ट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पुर्तगालने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच ख्रिस्टियाने रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. लढतीवर पोर्तुगालचे वर्चस्व दिसत असतानाच डिओगो कोस्टाने 24 व्या मिनिटाला गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्पेनने पोर्तुगालवर हुकूमत राखली. पण मध्यंतराला काही अवधी असतानाच रोनाल्डोने दुसरा गोल करून पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 

मध्यंतरानंतर स्पेनने आक्रमणाची धार वाढवली. 55 व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर निको याने 58 व्या मिनिटाला गोल करून स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरीस पोर्तुगाल पराभवाच्या छायेत असताना रोनाल्डोने 89 व्या मिनिटाला केलेला तिसरा गोल निर्णायक ठरला.

रोनाल्डोच्या या गोलच्या जोरावर पोर्तुगालने पराभव टाळत लढत बरोबरीत सोडवली. रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक ही या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक ठरली. 

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच काँटेकी लढत पाहायला मिळाली.


 #FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...

#FifaWorldCup2018 सलामीच्या लढतीत यजमान रशियाकडून सौदी अरेबियाचा पराभव...

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card