Wednesday, 16 January 2019

बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारताची बाजी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय मह्राराष्ट्र न्यूज, मुंबई

बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारतानं विक्रमी विजय साजरा केला. अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत भारतानी हा विजय मिळवला आहे. 

सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या शतकांमुळे भारतीय संघानं कसोटी सामन्यात पहिल्या डावात 474 धावा उभारल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: हात टेकले.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला.365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसऱा डाव 103 धावांत आटोपला.

आपला पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला भारताने एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली.india-vs-afghanistan-test-india-win-innings-and-262-runs

बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत आटोपला

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card