Wednesday, 16 January 2019

बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत आटोपला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून कसोटीचा पहिला सामना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगला. दमदार सुरुवातीनंतरही भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 109 धावांत गुंडाळलं. सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या शतकांमुळे भारतीय संघानं कसोटी सामन्यात चांगली सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. या सामन्याच्या पहिल्या अडीच तासांमध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत. 

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत नवा इतिहास घडवला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधीच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. पण दुर्दैवाची बाब म्हणजे शिखर धवन पुन्हा अल्पसंतुष्ट ठरला. उपाहारानंतर एक खराब फटका खेळून तो माघारी परतला.

शिखर धवनआधी हा पराक्रम कोणी कोणी गाजवला?

  • 1902 - ऑस्ट्रेलिया - व्हिक्टर ट्रम्पर,
  • 1926 - ऑस्ट्रेलिया - चार्लस मॅकार्टनी,
  • 1930 - ऑस्ट्रेलिया - डॉन ब्रॅडमन (इंग्लंडविरुद्ध कसोटी)
  • 1976-77 - पाकिस्तान - माजिद खान - (न्यूझीलंडविरुद्ध कसोटी)
  • 2016-17 - ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर - (पाकिस्तानविरुद्ध सिडनी कसोटी)

     
loading...

राशी भविष्य

Cricket Score Card