Sunday, 18 November 2018

#FiFaWorldCup2018 आजपासून रशियामध्ये रंगणार फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम…

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषकाचं महासंग्राम गुरुवारपासून रशियामध्ये रंगणार आहे, 32 दिवसांत 32 संघांमध्ये 64 सामने होणार असून, या संघाना 8 वेगवेगळ्या गटात विभागले जाईल. प्रत्येक संघातील 2 टॉप संघ प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहचतील आणि बाकीचे संघ मात्र बाहेर पडतील.

भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता ‘रशिया’ विरुद्ध ‘सौदी अरेबिया’च्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा मॉस्कोच्या ‘लुज्निकी स्टेडियम’मध्ये पार पडणार आहे.

ही स्पर्धा सुरु होण्याआधी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या उद्घाटन समारंभात ब्रिटनचा पॉप स्टार ‘रॉबी विल्यम्स’, अमेरिकन कलाकार ‘विल स्मिथ’चे सादरीकरण होणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या 21 व्या सामन्याची फायनल मॅच 15 जुलैला होणार आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card