Wednesday, 16 January 2019

इंटरकॉन्टिनेंटल चषकावर भारताचं नाव,सुनील छेत्रीने केली मेसीच्या विक्रमाशी बरोबरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चषकावर नाव कोरले आहे. भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने इंटरकांटिनेंटल चषक जिंकला. 
 
कर्णधार सुनील छेत्रीने शानदार फॉर्म कायम ठेवत  त्याने याबाबतीत फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याची बरोबरी केली आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल  खेळाडूंमध्ये त्याने दुसरं स्थान पटकावलं आहे. या लढतीत छेत्रीने आठव्या आणि २९व्या मिनिटाला गोल केले.
 
या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी 64 गोलची नोंद झाली आहे. 102 व्या सामन्या छेत्रीने 64 वा गोल केला आहे. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने 150 सामन्यांतून 81 गोल केले. देशासाठी सर्वाधिक गोल करणा-यांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे 21व्या स्थानी आहेत. 

न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी भारतीय संघात सात बदल केले होते. अंतिम फेरीत मात्र भारतीय संघ पुन्हा पूर्ण ताकदीसह उतरला. पूर्वार्धातच छेत्रीने एकापाठोपाठ दोन गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धातही भारतीय खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. लढतीच्या ४३व्या मिनिटाला छेत्रीला हॅटट्रिकची संधी होती.

मात्र, त्याला ही संधी साधता आली नाही. उत्तरार्धात गोलकीपर गुरप्रीतसिंग संधूने उत्कृष्ट बचाव करून केनियाच्या खेळाडूंना रोखले. यानंतर केनियाला शेवटपर्यंत भारताचा बचाव भेदता आला नाही. 

#IntercontinentalCup : भारताचा केनियावर दणदणीत विजय

#Intercontinental cup : भारताचा अनअपेक्षित पराभव, न्यूझीलंडची बाजी...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card