Wednesday, 21 November 2018

#Intercontinental cup : भारताचा अनअपेक्षित पराभव, न्यूझीलंडची बाजी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा २-१ ने पराभव केला. पराभव झाला असला तरी भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताकडून सुनील छेत्रीने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली होती.

पण न्यूझीलंकडून आंद्रे जोंग आणि मोसेस डायरने एक-एक गोल मारत भारतीय संघाची निराशा केली.

मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४७ व्या मिनिटाला दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सुनील छेत्रीने पहिला गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर लगेचच ४९ व्या मिनिटाल आंद्रे जोंगने ने गोल करुन बरोबरी केली.

हाफ टाइमच्या वेळी दोन्ही संघ ०-० ने बरोबरीवर होते. सामना संपण्याच्या थोडा वेळ आधी ८६ व्या मिनिटाला मेसेस डायरने गोल करुन भारताला धक्का दिला आणि न्यूझीलंडला विजयी आघाडी मिळवून दिली.

भारत आणि न्यूझीलंड सध्या ३-३ सामन्यानंतर सहा पॉईंट्सवर आहेत.

#2018 Intercontinental Cup : आज भारत - न्यूझीलंड आमनेसामने

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card