Saturday, 17 November 2018

अर्जुनची भारतीय युवा संघात वर्णी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 18 वर्षीय मुलगा अर्जुन तेंडुलकर याची भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेत पार पडणाऱ्या मालिकेसाठी या संघाला निवडण्यात आलं आहे. जुलै महिन्यात भारतीय युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

यामध्ये 4 दिवसीय आणि 5 वन डे सामने पार पडणार आहेत. या सामन्यांमधील 4 दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात अर्जुनची निवड करण्यात आली आहे. अर्जुन हा यापूर्वी मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघात खेळला आहे. अर्जुनने धरमशाला येथे नुकताच झालेल्या 25 खेळाडूंच्या सराव शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबिरातील कामगिरीच्या आधारावरचं भारताच्या या संघाची निवड करण्यात आली आहे.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card