Friday, 18 January 2019

सुनील छेत्रीच्या आवाहनाला विराट आणि सचिनचा पाठिंबा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत नुकताच इन्टरकॉन्टिनेन्टल कप चौरंगी फुटबॉल स्पर्धेचा सामना पार पडला या सामन्यात भारताने चीन तैपेईवर मात करत विजय मिळवला आहे. या सामन्यात फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र भारतीय फुटबॉल संघाचा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये फक्त अडीच हजार प्रेक्षक उपस्थित होते.

पण भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री मुंबईच्या फुटबॉल प्रेक्षकांवर निराश झाला होता. कारण मुंबई फुटबॉल एरिनात पार पडलेल्या भारत आणि चीन तैपेई सामन्याला मुंबईकरांनी हवा तसा प्रतिसाद दर्शवला नव्हता. छेत्रीने आपली ही निराशा सोशल मिडियाच्या एका पोस्टवरून व्यक्त केली आहे.

छेत्रीनं आपल्या पोस्टद्वारे सर्वांना एक भावनिक आवाहन केलं आहे छत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की “तुम्हाला आमचा खेळ आवडला नाही, तर आम्हाला शिव्या घाला, आमच्या कामगिरीवर टीका करा, पण स्टेडियममध्ये या” असं भावनिक आवाहन त्याने प्रेक्षकांना आपल्या पोस्टद्वारे केलं आहे.

 

सुनील छेत्रीची ही पोस्ट वाचल्य़ानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला पाठिंबा दर्शवत प्रेक्षकांना फुटबॉल सामना पाहण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

विराट आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, माझा मित्र आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केलेली पोस्ट मी वाचली. माझीही तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही स्टेडियममध्ये जा आणि भारतीय फुटबॉल संघाचा खेळ पाहा. तुम्हाला कोणताही खेळ आवड असला तरीही तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन भारतीय फुटबॉल संघाला पाठिंबा द्या.

 

 

सचिन आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, मित्रांनो तुम्ही आपल्या खेळाडूला समर्थन करायला हवं. समर्थकांकडून मिळणारं प्रेम आणि पाठिंबा हे खेळाडूंसाठी सर्वात उत्तम टॉनिक असतं. तुम्हीही या संघासोबत उभं राहा आणि त्यांना पाठिंबा द्या.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card