Thursday, 17 January 2019

#IPL2018Final सुपरकिंग्जने पटकावले तिसऱ्यांदा विजेते पट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या जबरदस्त खेळीने 2 वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुन्हा एकदा विजेतेपद पटकावलं आहे. चैन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने मागे टाकतं तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतं पद पटकावलं आहे. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 मध्ये आयपीएलच्या विजेतेपदाची बाजी जिंकली होती. शतकीने जबरदस्त खेळी करणारा शेन वॉटसन चैन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख सूत्रधार ठरला, त्याने 57 चेंडूंत 8 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली.

आयपीएलच्या फायनलमध्ये शतक पटकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील 2 वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईचं आयपीएलमधलं हे तिसरं विजेतेपद आहे.

वॉटसनने सुरेश रैनाच्या सोबतीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 57 चेंडूंत 117 धावांची भागीदारी पार पाडली. शेन वॉटसन खेळायला आला तेव्हा पहिल्या 10 चेंडूमध्ये त्याच्या खात्यात एकही धाव नव्हती. मात्र पुढच्या 41 चेंडूमध्ये विशेष खेळी करत त्याने 100 धावांचा विक्रम केला.

#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी?

#IPL2018Final चैनई VS हैदराबाद Live score

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card