Friday, 18 January 2019

#IPL2018 DD VS SRH - हैदराबादपुढे 164 धावांचं आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या 11 व्या मोसमातील आजच्या ३६व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांमध्ये सामना रंगत आहे. दिल्लीेने हैदराबादपुढे 164 धावांचे आव्हान उभे ठेवले आहे. या लढतीसाठी दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होत आहे.

 पृथ्वी शॉचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरची फटकेबाजी पाहता दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ जवळपास दोनशे धावा करेल, असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाले आणि दिल्लीची धावगती मंदावली. त्यानंतर अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही आणि दिल्लीला 163 धावांवर समाधान मानावे लागले. पृथ्वीची फटकेबाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. पृथ्वीने 36 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 65 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयसने 36 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 44 धावा केल्या.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card