Tuesday, 22 January 2019

बंगळुरुची २०५ धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी २०६ धावांचं आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल 2018 दक्षिण भारतातील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. बंगळुरुची २० षटकात २०५ धावांपर्यंत मजल मारत चेन्नईला विजयासाठी २०६ धावांचं आव्हान दिलं आहे.

चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात हरभजन आणि ताहिरला चेन्नईच्या संघात स्थान मिळालं आहे.दीपक चहारच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली संघासाठी पहिला चौकार लगावला. शार्दुल ठाकूरने विराट कोहलीला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. कोहलीने 15 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. शेन वॉटसनच्या बाराव्या षटकात डी'कॉकने षटकार फटकावत आपले अर्धशतक पूर्ण केले.

डी'व्हिलियर्सने आपल्या धडाकेबाज शैलीत चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ड्वेन ब्राव्होने आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडत डी'कॉकला माघारी धाडले. डी'कॉकने 37 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 53 धावा केल्या. इम्रान ताहिरने डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला आणि पुढच्याच चेंडूवर कोरे अँडरसनलाही तंबूचा रस्ता दाखवला. शार्दुल ठाकूरने 19व्या षटकात मनदीप सिंगला बाद करत बंगळुरुला पाचवा धक्का दिला. तर कॉलिन डी ग्रँडहोम, पवन नेगी आणि उमेश यादव ठराविक अंतराने माघारी गेले.

loading...

राशी भविष्य