Thursday, 17 January 2019

ख्रिस गेलच्या अभावी पंजाबचे फलंदाज लागोपाठ गारद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई 

पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता न आल्याने 143 धावांवर समाधान मानावे लागले आहे. नाणेफेज जिंकून दिल्ली डेअरडेविल्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात पंजाबकडून धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल खेळणार ़नसून चाहत्यांना हा मोठा धक्का असेल. ख्रिस गेलच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच सलामीला येणार आहे. सामन्याच्या सुरवातीलाच दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने पंजाबचा सलामीवीर आरोन फिंचला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. फिंचला यावेळी फक्त दोन धावा करता आल्या. मयांक अग्रवालने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चौकार लगावत संघाला झोकात सुरुवात करून दिली.

लायम प्लंकेटने पाचव्या षटकात लोकेश राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलने 10 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 19 धावा केल्या होत्या. राहुल पाठोपाठ ठराविक अंतराने फटकेबाजी करणारा मयांक अग्रवालही माघारी परतला. दिल्लीचा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने युवराजला यष्टीरक्षक रीषभ पंतकरवी झेलबाद केले. युवराजने 17 चेंडूंत 14 धावा केल्या.  15 षटकांत 4 बाद 100 धावांनंतर पंजाबची घसरगुंडी सुरुच  असून  करुण नायर पाठोपाठ  डेव्हिड मिलर माघारी गेल्याने पंजाबचा सहावा गडी गमवला आहे.ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंजाबचा कर्णधार अश्विनला बाद करत पंजाबने दिल्लीपुढे 144 धावांचे अाव्हान ठेवले आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card